नागपूर – थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लग्नाची पत्रिका द्यायला गेलेला उद्योजक आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असं कोणाला वाटलं होतं का? रविवारी भाजपने जाहीर केलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारांच्या यादीनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यातलं सर्वात धक्कादायक नाव म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांचं आहे.
भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत लखानी यांना वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून मैदानात उतरवलं आहे. या एकाच निर्णयामुळे विदर्भाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BJP Candidate Arun Lakhani Legislative Council Election
अरुण लखानी हे मूळचे विदर्भातील मलकापूरचे असून त्यांचं कुटुंब व्यवसायानिमित्त नागपुरात स्थायिक झालं होतं. ते ‘विश्वराज इन्फ्रा’ या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यामुळेच भाजपने मतांचं सर्व गणित जुळवून या नेत्याला संधी दिली असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्यवसाय आणि राजकारणासोबतच ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही क्रीडा क्षेत्रात सक्रिय राहिले आहेत.
दुसरीकडे लखानी यांचा मुलगा सारंग आणि सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती यांचा साखरपुडा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे जेव्हा लेकीच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पंतप्रधान मोदींना भेटल्या, तेव्हा लखानी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वतः अरुण लखानी यांनी माध्यमांना मोठी माहिती दिली. नाव समोर येताच सुप्रिया सुळे यांनी त्यांना थेट अभिनंदनाचा मेसेज पाठवला होता. राजकारण आणि वैयक्तिक कौटुंबिक संबंध नेहमी वेगवेगळे असतात, असं मत लखानी यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. आता या हायव्होल्टेज निवडणुकीत काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीचा फायनलमध्ये धमाका, वैभव सूर्यवंशीने मारली मोठी बाजी!
- धनंजय देशमुखांवरील ‘तो’ गुन्हा खोटा? समाधान खिंडकरच्या बनावामुळे बीडमध्ये मोठी खळबळ
- विक्रम काकडेंना मध्यरात्री लॉटरी, मुख्यमंत्र्यांचा तो एक फोन अन् पुण्यात भाजप बॅकफूटवर!
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








