Share

विक्रम काकडेंना मध्यरात्री लॉटरी, मुख्यमंत्र्यांचा तो एक फोन अन् पुण्यात भाजप बॅकफूटवर!

पुण्यात पाच तास चाललेल्या बैठकीनंतर आणि मुख्यमंत्र्यांच्या ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Published On: 

Vikram Kakde NCP candidate Pune Vidhan Parishad election list

पुणे- एकाच जागेसाठी तब्बल पाच तास खलबतं आणि थेट मुख्यमंत्र्यांचा एक फोन कॉल पुण्याचं संपूर्ण राजकीय समीकरण कसं बदलू शकतो, याचं जिवंत उदाहरण काल रात्री पाहायला मिळालं. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे.

रविवारी रात्री पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. या नाट्यमय घडामोडींमुळे आता पुण्यातील स्थानिक राजकारण चांगलंच तापलं आहे.

Vikram Kakde NCP Pune Vidhan Parishad Election

पुण्याची ही जागा आपल्याच खिशात राहावी यासाठी अजितदादा गटातील अनेक स्थानिक नेते प्रचंड आग्रही होते. दुसरीकडे… भाजपचे नेतेही या जागेवर डोळा ठेवून गळ टाकून बसले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे आधीच स्पष्ट झाले होते, पण उमेदवाराचे नाव निश्चित होत नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांकडून विक्रम काकडे यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळताच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.

या जागेवर आधी खासदार सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून आमदार सुनील टिंगरे यांना मैदानात उतरवले जाण्याची जोरदार चर्चा रंगली होती. मात्र ऐनवेळी सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याला संधी देत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात आता थेट ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असा सामना रंगणार हे आता उघड झाले आहे.

आज विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीने आपला फॉर्म्युला जाहीर केला असला तरी जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान नेत्यांपुढे असेल. अशातच शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील आपला अर्ज मागे घेतात की मैदानात शड्डू ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install