Share

महायुतीची अंतिम यादी जाहीर; १७ जागांचा सस्पेन्स संपला, पण ‘या’ नावावरून खळबळ!

विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून भाजपने ११, शिवसेनेने ४ आणि राष्ट्रवादीने २ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत.

Published On: 

Mahayuti Candidate List Vidhan Parishad Maharashtra leaders Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar

पुणे – जागावाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रचंड ओढाताण आणि नेत्यांची दिल्लीवारी यानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचा महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला आहे. तिन्ही पक्षांमध्ये जागांवर शिक्कामोर्तब झाले असून उमेदवारांची नावे समोर आल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अनेक दिवसांच्या रस्सीखेचीनंतर एकूण १७ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ११ जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ४ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Candidate List For Vidhan Parishad Election 2026

या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपने आधीच आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावेही जवळपास निश्चित झाली आहेत.

भाजपकडून अहिल्यानगरमध्ये नुकतेच पक्षात आलेले प्राजक्त तनपुरे यांना तिकीट मिळाले आहे. दुसरीकडे, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीतून अरुण लखाणी, अमरावतीतून प्रवीण पोटे, सोलापूरमधून राजेंद्र राऊत, सांगली-साताऱ्यातून धैर्यशील कदम, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, धाराशिव-बीड-लातूरमधून बसवराज पाटील, जळगावमधून नंदकिशोर महाजन आणि नागपूरमधून राजीव पोतदार निवडणूक लढवणार आहेत. भंडारा-गोंदियातून अविनाश ब्राह्मणकर रिंगणात उतरतील.

शिवसेनेने आपल्या ४ जागांवर जुन्याच शिलेदारांवर विश्वास दाखवला आहे. यामध्ये ठाण्यातून रवींद्र फाटक, नाशिकमधून नरेंद्र दराडे, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी आणि परभणी-हिंगोलीतून सईद खान यांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत तटकरे यांचे नाव निश्चित केले असून, पुण्याच्या जागेसाठी विक्रम काकडे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने या जागा रिक्त होत्या. आज १ जून ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. मविआ या तगड्या उमेदवारांवर कसा हल्लाबोल करते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install