Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे पोलिसांकडून केले जात आहेत. आरोपींकडून पोलीस कसून चौकशी केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरातून मोर्चे काढले जात आहेत. अशातच आता पोलिसांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. (Santosh Deshmukh murder case)
पोलिसांनी आरोपींचा फोन जप्त केला आहे. फोनमध्ये अधिक तपास केला असता जप्त केलेल्या फोनमध्ये देशमुख यांना मारहाण केली असल्याच्या व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहे. हा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. याबाबत एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. देशमुख यांना जखमी करण्यासाठी कठोर आणि बोथट वस्तूंने एका ठिकाणी सतत मारले जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांची हत्या करण्यासाठी 3.5 फूट लांब गॅस सिलिंडर पाईप, लोखंडी खिळ्यांनी गुंडाळलेला पाईप आणि लाकडी दांडक्यांचाही वापर केला होता. सर्व शस्त्रे सीआयडीने जप्त केली आहेत. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर 56 जखमा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान,संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण पसरले आहे.
Santosh Deshmukh murder case Evidence
आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी देशमुख कुटुंबियांसह सर्वच स्तरातून होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :