Sudarshan Ghule । आज पुण्यातून पोलिसांनी सुदर्शन घुले (Sudharshan Ghule), सुधीर सांगळे (Sudhir Sangle) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष पोलिस पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर छापेमारी करून या आरोपींना ताब्यात घेतले आहे. पण कृष्णा अंधाळे हा आरोपी अजून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आज या प्रकरणातील (Santosh Deshmukh murder) अटकेत असणाऱ्या आरोपींना केज कोर्टामध्ये हजर केले होतं. कोर्टाने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सोनवणे यांना 18 तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी ही संघटीत गुन्हेगारी असा उल्लेख करत मकोका लावण्यासंदर्भात भाष्य केले आहे. हे लोक टोळीने गुन्हे करून उद्योगधंद्यांना त्रास देतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
आरोपींना 15 दिवसांच्या रिमांडची मागणी पोलिसांनी केली होती. तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असणारे मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आका म्हणजे विष्णू चाटे होय. तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा आरोपींच्या वकिलाने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :