Share

Manoj Jarange। संतोष देशमुख हत्येप्रकरणी जरांगे आक्रमक, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Manoj Jarange, The Maratha community had earlier also held a march in Beed regarding the murder of Sarpanch Santosh Deshmukh. A march was held in Parbhani today. Many leaders were present on this occasion.

by MHD

Published On: 

Manoj Jarange। संतोष देशमुख हत्येप्रकरणी जरांगे आक्रमक, घेतला 'हा' मोठा निर्णय

Manoj Jarange। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha resrvation) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सतत सरकारची कोंडी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मनोज जरांगेंनी मोठी घोषणा करत मराठा समाजाला आवाहन केले आहे.

मराठा समाजाने यापूर्वीही बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोर्चा काढला होता. आज परभणीत मोर्चा काढला. यावेळी अनेक नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला आहे. “पुण्यात आरोपींना कोणी सांभाळले? गंभीर गुन्ह्यातील सगळ्या आरोपींना पुण्यातूनच का अटक होते? या आरोपींची नार्को टेस्ट व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उद्या पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी मोठ्या संख्येने मराठा बांधवांना जमण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, आज पुण्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे याला अटक केली आहे. तर अजूनही पोलिसांना एका आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे.

Manoj Jarange Patil on Santosh Deshmukh Murder Case

तसेच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना 15 दिवसांच्या रिमांडची मागणी पोलिसांनी केली होती. तर दुसरीकडे आरोपींच्या कोठडीसाठी एसआयटीकडे असणारे मुद्दे पुरेसे नाहीत. जवळपास या गुन्ह्यातल्या सर्व आरोपींना अटक केली असून याप्रकणातील आका म्हणजे विष्णू चाटेला देखील अटक केली आहे, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही