Bank Strike: बँकांना आठवड्यातून पाच दिवस काम (5 Day Banking) लागू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. बँकांसाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही आणि सरकारकडून असा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता, असे अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या भूमिकेनंतर बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.
‘ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन’चे (AIBOC) सरचिटणीस रूपम रॉय यांच्या दाव्यानुसार, मार्च २०२४ मध्ये ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ आणि बँक युनियन्स यांच्यात झालेल्या १२ व्या द्विपक्षीय वेतन करारात ५ दिवसांच्या आठवड्यावर सहमती झाली होती. मात्र, अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते, हा विषय कराराच्या चर्चेत कधी नव्हताच आणि यावर कोणतीही अंतिम सहमती झालेली नव्हती, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
पाच दिवसांची बँकिंग लागू केल्यास देशातील छोटे व्यापारी, शेतकरी आणि सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या सेवांवर विपरीत परिणाम होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. मागणी फेटाळल्यामुळे ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’च्या (UFBU) नेतृत्वाखाली २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत सरकारी बँकांमध्ये संप पुकारण्यात आला आहे.
या संपकाळात बँक शाखांमधील चेक क्लिअरन्स, कॅश भरणे आणि काढणे यांसारखे काउंटरचे काम प्रभावित होईल. मात्र, यूपीआय (UPI), नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरळीत सुरू राहतील. संपाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरबीआयच्या सूचनेनुसार २७ सप्टेंबर रोजी (रविवारी) काही प्रमुख बँकांच्या शाखा चालू ठेवण्याचे नियोजन केले जात आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; ‘ECINet’ आणि मतदार यादीच्या घोळावर आक्षेप
- सिल्व्हर ओकवर शरद पवारांची महत्त्वाची बैठक; पार्थ, जय आणि युगेंद्र पवारही उपस्थित
- निवडणूक आयोगावरील आरोपांत NDA च्या मंत्र्याची उडी; ज्ञानेश कुमारांनी भूमिका स्पष्ट करावी
Quick Answers
बँकांना आठवड्यातून पाच दिवस काम (5 Day Banking) लागू करण्याच्या मागणीला केंद्र सरकारने नाकारल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी संपाची हाक दिली आहे.
सरकारी बँकांमधील कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत संप करणार आहेत.
संप सुरू असला तरी यूपीआय (UPI), नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम यांसारख्या सेवा सुरळीत सुरू राहतील.
पाच दिवसांचा आठवडा करण्याचे कोणतेही आश्वासन सरकारने दिले नव्हते आणि या विषयावर कोणतीही अंतिम सहमती झालेली नव्हती, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








