🕒 1 min read
Jitendra Awhad । सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. (Santosh Deshmukh case) या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक केली आहे. हाच मुद्दा उचलून धरत विरोधकांनी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि वाल्मिक कराडचा शेअर करत तपासावरुन काही सवाल उपस्थित केले आहेत.
“संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारने नेमलेल्या SIT मधे एक प्रमुख PSI बाहेरील नेमला असून त्यांच्याखाली दिलेले अधिकारी हे वाल्मिक कराडचे (Walmik Karad) पोलीस आहेत. यातील एक PSI महेश विघ्ने पहा. धनंजय मुंडे निवडून आल्यावरचा हा फोटो आहे. त्यांचे किती जवळचे आणि प्रेमाचे संबध आहेत पहा. हे असले अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की उलट त्यांनाच मदत करतील? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
निवडणुकीदरम्यान विघ्ने याने धंनंजय मुंडेचा कार्यकर्ता आसल्याप्रमाणे काम केले आहे. मनोजकुमार वाघ हा वाल्मीक कराडचा अतिशय खास माणुस आहे. मागील 10 वर्षे तो बीड LCB मध्येच असून तो फक्त कराडसाठीच काम करत आहे,” असे जितेंद्र आव्हाड यांनी एक्सद्वारे म्हटले आहे.
Jitendra Awhad on Dhanjay Munde & Walmik Karad
दरम्यान, या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाल्मिक कराडचे मित्र असलेले पोलीस अधिकारी निष्पक्ष चौकशी कशी करणार का? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘त्या’ वक्तव्यावरून Abhijeet Bhattacharya यांना लीगल नोटीस; नेमकं प्रकरण काय?
- Santosh Deshmukh । धक्कादायक! आरोपींनी रेल्वे स्टेशनवर ‘ती’ बातमी पाहिली अन्….
- धनंजय मुंडेंवर Manoj Jarange पुन्हा कडाडले, म्हणाले; “शहाणा हो नाहीतर….”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










