फ्रँचायझी लीग्जसाठी ICC कडून नवे नियम लागू होण्याची शक्यता; MLC, ILT20 ला बसणार मोठा फटका

आयसीसीने फ्रँचायझी लीग्जमध्ये परदेशी खेळाडूंची संख्या निश्चित केल्यास अमेरिका आणि यूएईमधील टी-२० लीग्जच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Published On: 

ICC to introduce new rules for franchise cricket leagues

प्रतिनिधी, 13 नोव्हेंबर: जगभरात वाढत चाललेल्या फ्रँचायझी क्रिकेट लीगसाठी एकसमान नियमावली लागू करण्याच्या तयारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आहे. या आठवड्याच्या शेवटी बाली येथे होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असून, नव्या नियमांमुळे मेजर लीग क्रिकेट (MLC) आणि आयएलटी२० (ILT20) यांसारख्या लीग्जला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सध्या वेगवेगळ्या देशांतील क्रिकेट लीग्जचे नियम वेगवेगळे आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीसीने जुलै महिन्यात सर्व फ्रँचायझी लीगचा बारकाईने आढावा घेण्यासाठी एका समितीची (रिव्ह्यू ग्रुप) स्थापना केली होती. या समितीने आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर काही महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले असून त्यावर सध्या विचार सुरू आहे.

प्लेइंग इलेव्हनमधील परदेशी खेळाडूंची संख्या निश्चित करणे हा या प्रस्तावातील मुख्य मुद्दा आहे. यासोबतच लीगला मान्यता देताना आयसीसीचे अधिकार वाढवून ऑडिट करणे, बेटिंग किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या प्रायोजकत्वावर निर्बंध आणणे आणि लीगच्या मान्यतेसाठी शुल्क आकारणे यांसारख्या शिफारशीही समितीने केल्या आहेत.

आयपीएल (IPL) आणि बिग बॅश लीग (BBL) यांसारख्या स्पर्धांमध्ये मर्यादित परदेशी खेळाडूंना संधी देऊन स्थानिक गुणवत्तेला प्रोत्साहन दिले जाते आणि व्यवसायाचा विस्तार केला जातो. मात्र, अमेरिका (MLC) आणि यूएईमधील (ILT20) लीग्ज प्रामुख्याने परदेशी स्टार खेळाडूंवर अवलंबून आहेत. सध्या आयएलटी२० मध्ये एका असोसिएट सदस्यासह तब्बल ९ परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा आहे, तर एमएलसीमध्ये ६ परदेशी खेळाडू प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.

बाली येथील बैठकीत या प्रस्तावांना मार्गदर्शक तत्त्वे म्हणून मंजुरी दिल्यास या लीग्जच्या अडचणी वाढू शकतात. स्टार खेळाडूंमुळेच या लीग्जची मोठी कमाई होते, कारण अमेरिका आणि यूएईच्या राष्ट्रीय संघांमध्ये स्टार खेळाडूंचा अभाव आहे. त्यामुळे आयसीसीने परदेशी खेळाडूंची संख्या मर्यादित करण्याचे निर्देश दिल्यास, त्यांना स्थानिक खेळाडूंवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. अशा परिस्थितीत लीगचे मालक आणि गुंतवणूकदारांची भूमिका काय असेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही