‘त्या’ वक्तव्यावरून Abhijeet Bhattacharya यांना लीगल नोटीस; नेमकं प्रकरण काय?

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते.”, असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य ( Abhijeet Bhattacharya ) यांनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

Published On: 

'त्या' वक्तव्यावरून Abhijeet Bhattacharya यांना लीगल नोटीस; नेमकं प्रकरण काय?

Abhijeet Bhattacharya । प्रसिद्ध बॉलीवूड गायक अभिजीत भट्टाचार्य ( Abhijeet Bhattacharya ) यांनी नुकतंच एका मुलाखतीत बोलताना अभिजीत भट्टाचार्य यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता हेच वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांना चांगलंच महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

“महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते”, असं वक्तव्य अभिजीत भट्टाचार्य यांनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांना थेट कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. पुण्यातील वकील असिम सरोदे यांनी त्यांचे क्लाएंट मनिष देशपांडे यांच्या वतीने अभिजीत भट्टाचार्य यांना नोटीस पाठवली आहे.

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अभिजीत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात फौजदारी खटला करण्यात येणार असल्याचा इशारा या नोटिशीतून देण्यात आला आहे.

अभिजीत भट्टाचार्य नेमकं काय म्हणाले होते?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना अभिजीत भट्टाचार्य म्हणाले होते की, “महात्मा गांधी हे भारताचे नव्हे, तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. भारत आधीच भारत होता. पाकिस्तानची निर्मिती झाली आहे. महात्मा गांधींचं इथे राष्ट्रपिता असं चुकीचं वर्णन करण्यात आलं. तेच जन्मदाता होते, तेच पिता होते, तेच आजोबा होते आणि तेच सर्वकाही होते.”

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही