Kalicharan Maharaj । कालीचरण महाराज हे वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकदा ते आक्षेपार्ह आणि वाद निर्माण करणारे वक्तव्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) विरोधात वादग्रस्त केल्याने अटक देखील केली होती.
अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेते राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) यांनी शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले होते. याच वक्तव्यावरून आता कालीचरण महाराजांनी त्यांचा समाचार घेतला आहे. (Kalicharan Maharaj vs Rahul Solapurkar)
“छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदुत्वाचे रक्षण करणाऱ्या महान पुरुषांचा अपमान करतील त्यांची सर्व हिंदूंनी त्यांची मुंडके छाटून काली मातेला त्यांच्या मुंडक्यांची माळ घालावी. कारण हिंदूंच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना हाच दंड असतो. ज्यांना आत्महत्या करण्याची हौस आलेली आहे त्यांनी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी स्वतःच्या मुंडक्या उतरून जीव द्या. यातच हिंदूंच कल्याण आहे,” असा दावा कालीचरण महाराजांनी केला आहे.
Kalicharan Maharaj on Rahul Solapurkar
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजबद्दल वक्तव्यावरून राज्याचे राजकारण अजूनही तापले आहे. जरी सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्यावरून माफी मागितली असली तरी हे प्रकरण शांत झाले नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील सोलापूरकर यांच्यावर योग्य कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सोलापूरकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :