Raj Thackeray | जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: आज (02 ऑक्टोबर) जगभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली जात आहे. या दिवशी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासी महात्मा गांधींना अभिवादन करतात.

तर काही मान्यवरांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे.

ट्विट करत राज ठाकरे म्हणाले, “आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू ह्याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली.

जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतील ही किंवा नसतील ही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.”

There will probably be no one else like Gandhiji – Raj Thackeray

“महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की, जे देशाच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना.

गांधीजीचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही.

विशिष्ट राजकीय सामाजिक परिस्थितीत प्रवळ वाटणारे नेते आले, कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षातच मागे पडलेले दिसले आहेत.

दुसरे महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले, पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. ह्याला कारण चर्चिल ह्यांच योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं, ते चिरकाल टिकावं असं नव्हतं.

पण गांधीजीय तत्वज्ञान व्यापक होतं. श्रृंखला मग त्या अज्ञानाच्या असोत, की गुलामगिरीच्या वसाहतवादाच्या की जातीच्या, त्या श्रृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कोणालाच नाही.

कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यानी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला, हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे.

म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरे कोणी होणे नाही.आज महात्मा गांधी जयंती. गांधीजीच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.