Chitra Wagh | आम्ही वाघनखं आणणार म्हणून नकली वाघांना पोटशूळ उठलाय; चित्रा वाघांचा आदित्य ठाकरेंना टोला

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं लंडनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे.

भारतात आणलं जाणार वाघ नखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेलं आहे की शिवकालीन आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं होतं.

आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. आम्ही शिवरायांची वाघनखं आणणार म्हणून इथल्या नकली वाघांना पोटशूळ उठला आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

The edge of the tiger’s claws is still as sharp today – Chitra Wagh

ट्विट करत चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे.

छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढलात् यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत. पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे.

आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे. पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?”

दरम्यान, या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांच्यासह विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देखील भाजपा शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार म्हणाले, “शिवरायांचे स्मारक बनवू शकले नाही, ते वाघनखं काय आणणार? वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा”.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.