Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. यावरून विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.
भारतात आणली जाणारी वाघ नखं शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी म्हटलं होतं.
आदित्य ठाकरेंनंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वाघ नखावरून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. वाघ नखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
Bringing tiger claws is BJP’s new fund for vote politics – Vijay Wadettiwar
विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी वाघ नखावरून ट्विट करत भारतीय जनता पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.
“शिवरायांचे स्मारक बनवू शकले नाही, ते वाघनखं काय आणणार? वाघनखे आणणे हे मतांच्या राजकारणासाठी भाजपचा नवीन फंडा”, असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “वाघ नखे येणार कळताच, इथले नकली वाघ का बिथरले? छत्रपतींंच्या वंशजांकडे पुरावे मागणारे आता वाघ नखांचेही पुरावे मागू लागले?
आम्हाला शिवकालीन जे जे सापडेल ते ते सारे प्रिय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती सुद्धा आम्हास वंदनीय इथे हळूहळू हळूहळू औरंगजेबी वृत्ती मात्र डोकं वर काढतेय?
महाराजांच्या पराक्रमाचेच इथे पुरावे मागतेय? आदू बाळाने शाळेतील पुस्तक सोडून अन्य काही वाचलेय का? यांना वाघ नख टोचतात आणि पेंग्विन घेऊन हे गावभर नाचतात? अहो, पब मधला थरथराट बाहेर असा कोण करतो का? अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का?”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | भाजप निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळ खेळतोय – संजय राऊत
- Ashish Shelar | अफझलखान तुमचा कोण पाहुणा लागतो का? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं
- Vijay Wadettiwar | मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला इव्हेंट बनवू नका; वडेट्टीवारांचा भाजपला इशारा
- Uddhav Thackeray | मोदी ‘विश्वगुरू’ असले तरी भारत विरोधी फौजांचा बिमोड करू शकले नाही; ठाकरे गटाची टीका
- Eknath Shinde | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या रात्रीच्या बैठकीत नेमकं घडलं काय?