Share

Vijay Wadettiwar | मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला इव्हेंट बनवू नका; वडेट्टीवारांचा भाजपला इशारा

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीचा ओबीसी समाजाने विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला तुमच्या पक्षाचं इव्हेंट बनवू नका. समाजाची प्रगती व उन्नती … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीचा ओबीसी समाजाने विरोध केला आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला तुमच्या पक्षाचं इव्हेंट बनवू नका. समाजाची प्रगती व उन्नती तेव्हाच होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Will you cancel the contract recruitment orders that destroy reservation for OBCs? – Vijay Wadettiwar 

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “ओबीसींना गाजर देणाऱ्या सत्ताधाऱ्यांची बेगडी जागर यात्रा… भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आज ओबीसी जागर यात्रेत खालील गोष्टींवर जागर करावा.

१) ओबीसींचे आरक्षण घालविणाऱ्या कंत्राटी नोकरभरती चे आदेश रद्द करणार का?

२)ओबीसी समाजाला २७% आरक्षण असताना सरकारी नोकरीत ओबीसी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त १२% का? १५% टक्के जागा रिक्त का ठेवण्यात आल्या आहे?

३) परदेशी शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती संख्या १०० विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार का?

४) सत्तेत आल्यावर एक महिन्यात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे वचन भाजपचे उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. सत्तेत येऊन दीड वर्ष होत आले ओबीसीचे कमी झालेले राजकीय आरक्षण परत कधी देणार?

५) ओबीसी समाजाकरीता काँग्रेसने स्व.विलासराव देशमुख यांच्या काळात ५०% शिष्यवृत्ती योजना आणली होती, ती १०० टक्के करणार का?

६) गुपचूप सरसकट ओबीसी (कुणबी) प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी बावनकुळे करणार का ?

७) बोगस प्रमाणपत्रावर ओबीसींच्या हक्काच्या नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी ते गृहमंत्र्यांकडे करणार का?

८) खोट्या प्रमाणपत्राद्वारे नोकऱ्या मिळवून मंत्रालयात बसलेल्यांचा शोध बावनकुळे घेणार काय?

९) केंद्र सरकारच्या 90 अधिकाऱ्यांपैकी फक्त 3 #OBC का?

१०) पंतप्रधानांकडे ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करणार का ? चंद्रशेखर बावनकुळे ओबीसी समाजाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती द्या, प्रामाणिकपणे जागर करा.

मतांचं राजकारण करण्यासाठी ओबीसी समाजाला तुमच्या पक्षाचं इव्हेंट बनवू नका. समाजाची प्रगती व उन्नती तेव्हाच होईल. चला #ओबीसी जागर करू!

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही