Ashish Shelar | बालबुद्धीचा कळस गाठू नका; आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जपान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी बालबुद्धीपणाचा कळस गाठू नये, असं  आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

The entire expenses of Devendra Fadnavis’s visit to Japan were borne by the Japanese government – Ashish Shelar 

ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्‍याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते.

अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्‍या अधिकार्‍यांचा खर्च केलेला आहे.

जपान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्‍यामुळे आली आहे.

वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने दुसर्‍यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका!

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर देखील टीका केली आहे. “मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला.

नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी ह्यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे.

त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.