Share

Sharad Pawar | हिवाळी अधिवेशनाच्या आधी शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं; शरद पवार गटाचा दावा

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटानं आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अपात्र आमदारांच्या याचिकेवर नोव्हेंबर पर्यंत निर्णय अपेक्षित आहे. याच पार्श्वभूमीवर … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप येऊन गेले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेना ठाकरे गटानं आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अपात्र आमदारांच्या याचिकेवर नोव्हेंबर पर्यंत निर्णय अपेक्षित आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मोठा दावा केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं, असं महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी म्हटलं आहे.

Unemployment is increasing day by day in the state – Mahesh Tapase

पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना महेश तपासे म्हणाले, “राज्यामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चालली आहे. राज्य शासन रोजगार निर्मिती करण्यात पूर्णपणे अपयशी ठरताना दिसत आहे.

पुरेसा पाऊस न पडल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे हे प्रश्न सरकार ऐकत नसल्याने युवक वर्गावर मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याची वेळ आली. त्यांच्या या आंदोलनाला राज्य सरकार जबाबदार असेल.

सरकार सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता देखील मंत्रालयात येऊन आंदोलन करू शकते. त्यांनी जर आंदोलन केलं तर ही अत्यंत खेदजनक बाब ठरेल.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “कल्याण लोकसभा मतदारसंघात जागेवरून शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. कल्याणमध्ये महायुतीचा कोणताही उमेदवार असला तरी या ठिकाणी इंडिया आघाडीला जनतेतून प्रतिसाद मिळेल.

आगामी निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येईल. आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही