Raj Thackeray | राज ठाकरेंचं नवीन व्यंगचित्र व्हायरल; खास संदेश देत म्हणाले…

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: तृप्ती देवरुखकर मराठी असल्यामुळे त्यांना मुलुंडमध्ये जागा देण्यास नाकार दिला असल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

सर्व राजकीय पक्षांनी या वादामध्ये सहभाग घेतला आहे. तर या पार्श्वभूमीवर मनसेने आक्रमक भूमिका मांडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं हे नवीन व्यंगचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रेखटलेल्या व्यंगचित्रात तामिळ पंजाबी, गुजराती, बंगाली अस्मिता दर्शवणाऱ्या महिला चांगल्या साडीत उभ्या आहेत. तर मराठी अस्मिता दर्शवणारी महिला थिगळं जोडलेली साडी नेसल्याचं दाखवण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांचं व्यंगचित्र ट्विटरवर शेअर करत मनसेनं म्हटलं आहे की, “राजधानी हातातून गेली कि राज्य गेलं… आज महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसांना जेरीस आणून हातातून हिसकावून घेतली जात आहे पण तरीही आम्ही एकसंध मराठी समाज म्हणून लढायला तयार नाही. आम्ही जातीय विद्वेषात गुरफटलो आहोत. #मराठीमाणूस”

Marathi people are not given houses in Mulund

दरम्यान, तृप्ती देवरुखकर मुंबईत मुलुंडमध्ये राहतात. मुलुंडमध्ये मराठी लोकांना घरे दिली जात नाही, त्यांना जाणून बुजून डावरलं जातं. त्याचबरोबर या परिसरामध्ये दररोज अशा घटना घडताना दिसतात, आपली व्यथा मांडत तृप्ती देवरुखकर यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे (Raj Thackeray) कार्यकर्त्यांनी पुढे येत संबंधित व्यक्तीला माफी मागायला लावली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.