BJP | लोकसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू; 7 आमदार उतरणार मैदानात?

BJP | टीम महाराष्ट्र देशा: आगामी निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांच्या एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधकांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली आहे.

विरोधकांच्या आघाडीच्या आतापर्यंत अनेक बैठका पार पडल्या आहे. तर दुसरीकडे निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने देखील जय्यत  तयारी सुरू केली आहे.

भाजपचे 07 दिग्गज नेते या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राज्यासह देशाच्या राजकारणात सुरू झाल्या आहे. भारतीय जनता पक्षाचे 07 आमदार लोकसभेसाठी मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

BJP party has started strong preparations for the upcoming elections

आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपचे 07 दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

यामध्ये गिरीश महाजन, आकाश फुंडकर, राम सातपुते, सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, राहुल नार्वेकर आणि संजय केळकर या नावांच्या चर्चा सुरू आहे.

या नेत्यांची मतदारसंघातील लोकप्रियता जातीय समीकरण पाहून आमदारांना खासदारकीसाठी मैदानात उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. या माहितीनंतर देशासह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटानं आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खोचक टीका केली आहे. आपले स्पीकरसाहेब घानाच्या भूमीवर निघाले आहेत ते जगाची लोकशाही बळकट करण्यासाठी.

त्यांच्या राज्यात लोकशाही धाराशाही पडली आहे व स्पीकरसाहेबांच्या शेरवानीवर त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. लोकशाहीचा मुडदा पाडणाऱयांचे स्वागत घानात होणार आहे काय?

लोकशाहीचा पवित्र आत्मा लोकशाहीच्या मंदिरात मारायचा व त्याच लोकशाहीची ‘घंटा’ बडवत घाना देशी लोकशाहीच्या आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवायचे हे ढोंग आहे.

लोकशाहीचा खून करून लोकशाही कल्याणाची प्रवचने झोडणे म्हणजे इदी अमिनने मानवतेवर चर्चा करण्यासारखेच आहे. स्पीकरसाहेब (ट्रिब्युनल) घानात निघाले होते, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.