Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे शरद पवारांनी थुंकलेली सुपारी – नितेश राणे

Nitesh Rane | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप गंजलेला बांबू असेल तर ठाकरे गट शरद पवारांनी थुंकलेली सुपारी आहे, असं म्हणतं नितेश राणे यांनी ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे.

Is Urban Naxal and Sanjay Raut related? – Nitesh Rane

ठाकरे गटाच्या टिकेला प्रत्युत्तर देत नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, “अर्बन नक्षल आणि संजय राऊत यांचा काही संबंध आहे का? दोघांचे गुण आम्हाला सारखे वाटत आहे. त्यामुळे केंद्राने या संदर्भात चौकशी करायला हवी.

ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षाला गंजलेला बांबू म्हटलं आहे. भाजप जर गंजलेला बांबू असेल तर ठाकरे गट शरद पवारांनी थुंकलेली सुपारी आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तब्येत जेव्हा खालावली होती, तेव्हा आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) परदेशी दौरे करत होते.

वडील आजारी असताना मी मुख्यमंत्री कसा होईल? याचा विचार आदित्य ठाकरे करत होते. मात्र, आज आमच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे आपला परदेशी दौरा रद्द केला आहे.

दरम्यान, सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. कांग्रेस हा गंजलेल्या लोखंडासारखा आहे असे तुम्ही म्हणत असाल, पण भाजप हा विचार नसलेल्या पोकळ बांबूसारखा झाला आहे.

गंजलेल्या लोखंडावर काँग्रेसचा डोलारा तरला आहे, पण मोदी-शहांच्या वेस्ट इंडिया कंपनीचे काय? ईस्ट इंडिया जे कायदे पाळत होती तेवढेही कायदे मोदी-शहांची कंपनी पाळायला तयार नाही.

महाराष्ट्रासारख्या राज्यात बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकारला वाचवण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे सरकार बेकायदा ठरवूनही ते सरकार चालू देणे हे गंजलेल्या मेंदूचे व गांजलेल्या विचारांचे लक्षण आहे. काँग्रेस गंजलेले लोखंड असेल तर भाजप हा ‘गांजलेला’ पक्ष आहे.

गंज काढण्याच्या अनेक उपाययोजना आहेत. गांजलेल्यांचे वैफल्य व नैराश्य दूर करणे कठीण असते. काँग्रेसचा गंज उतरू लागला आहे व लोखंडही सोन्यासारखे उजळून निघेल, पण गांजलेल्यांचे काय?, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.