Sanjay Raut | आदित्य ठाकरेंमुळे CM शिंदेंचा परदेशी दौरा रद्द झालाय – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: 01 ऑक्टोबर 2023 पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परदेशी दौऱ्यावर जाणार होते. त्यांच्या या परदेशी दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सवाल उपस्थित केला होता.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना धारेवर धरलं आहे. आदित्य ठाकरेंमुळे सीएम शिंदे यांचा परदेशी दौरा रद्द झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Bring Mumbai back to its old glory – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांची बातचीत करत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आदित्य ठाकरेंमुळे एकनाथ शिंदे यांचा परदेशी दौरा रद्द झाला आहे. राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हा दौरा रद्द झाला असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र, त्यांना ही दुष्काळ स्थिती आधी दिसली नव्हती का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक घाईघाईने परदेशी दौऱ्यावर निघाले होते. ते कोणत्या देशात चालले होते, हे मला माहित नाही. ही माहिती अत्यंत गुप्त होती.

ते जर्मनी किंवा युकेला भेट देणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या दौऱ्यादरम्यान ते महाराष्ट्रात गुंतवणूक आणणार होते. त्यासाठी आम्ही त्यांच्या आभारी आहोत.

मात्र, महाराष्ट्रातून त्यांच्या कारकिर्दीत ज्या गुंतवणूक बाहेर गेल्या आहे, त्या आधी त्यांनी परत आणाव्या. मुंबईला पुन्हा एकदा जुनं वैभव मिळवून द्या. तुम्ही परदेशी दौऱ्यावर गेल्यावर काय होणार? सरकारी पैशाचा अपव्यय.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “नागपूर बुडत आहे, हे त्यांना काल कळालं आहे का? नागपूरमध्ये लोकांचा आक्रोश सुरू असताना, मुख्यमंत्री काय करत होते?

ते आपल्या शासकीय निवासस्थानी कलाकारांसोबत उत्सव साजरा करत होते. दुखतप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी कुठे असायला हवं? ज्या ठिकाणी जनता आक्रोश करत आहे, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहायला हवं. महाराष्ट्रात विघ्न आलं आहे आणि महाराष्ट्राचा विघ्नहर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरला जायला हवं होतं.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.