Share

Supriya Sule | चला, आपण धाब्यावर जाऊ; सुप्रिया सुळेंनी भाजपला धारेवर धरलं

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आपल्या विरोधात 2024 पर्यंत पत्रकारांनी एकही बातमी छापून नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला कळालच असेल, असा सल्ला बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून … Read more

Published On: 

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आपल्या विरोधात 2024 पर्यंत पत्रकारांनी एकही बातमी छापून नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा.

चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं तुम्हाला कळालच असेल, असा सल्ला बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला चांगलं धारेवर धरलं आहे.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांची कविता ट्विट करत भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे.

Why did accidents increase on Samrudhi Highway? – Supriya Sule

हेरंब कुलकर्णी यांची कविता ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या,

मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू

ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!

धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले ” हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?”

मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले …..

न्यायमूर्ती लोया नागपुरात,
नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
समोर मेन्यू कार्ड धरले …

शेतकरी आत्महत्या भागात,
दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा ,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?

मी विचारले कंटाळून,
अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
तुम्ही गिफ्ट काय घेणार ?

कंटाळून विचारले शेवटी मी –

९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
पत्रकारांची
ताडोबात ट्रीप कधी काढायची ?

आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..

हेरंब कुलकर्णी

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही