Chandrakant Khaire | चंद्रशेखर बावनकुळेंना काही किंमत नाहीये – चंद्रकांत खैरे

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Chandrakant Khaire | छत्रपती संभाजीनगर: आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. अशात या मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आपल्या विरोधात 2024 पर्यंत पत्रकारांनी एकही बातमी छापू नये, म्हणून तुम्ही त्यांना चहा प्यायला आणि ढाब्यावर घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय करायचं हे तुम्हाला समजलं असेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे मोठे वाचाळवीर असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Chandrasekhar Bawankule has no value – Chandrakant Khaire 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे यांना काही किंमत नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे सर्वेसर्वा आहे. बावनकुळे यांना कोणी विचारत नाही.

चंद्रशेखर बावनकुळे एक वाचाळवीर आहे. ते काहीही बोलतात. पत्रकारांना चहा प्यायला न्या, जेवायला न्या, असं त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. मात्र पत्रकारांना कसं सांभाळायचं हे कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं.

बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना असा सल्ला देऊन, त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे. बावनकुळे कधीही काही बोलायला लागले आहे. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास न करता ते बडबड करतात.

त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये, अशी मी त्यांना विनंती करतो. ही त्यांना मी ताकीद नाही देत तर मी त्यांना विनंती करत आहे. कारण चंद्रशेखर बावनकुळे मोठे नेते आहे.”

दरम्यान, या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळेंचा चांगला समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, “पाणी पाजणाऱ्यांच्या गोष्टी आम्ही आतापर्यंत ऐकल्या होत्या.

परंतु, पत्रकारांना चहा पाजण्याची गोष्ट आम्ही पहिल्यांदाच ऐकली आहे. राजकारणी आणि पत्रकाराचं एक आगळ वेगळं नातं असतं. हे दोघं एकमेकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या नात्यात कधी कटूता असते, तर कधी गोडवा असतो.”

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe