Chandrashekhar Bawankule | शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला समर्थन – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | नाशिक: तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन (Udhayanidhi Stalin) यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंगू आणि मलेरियाशी केली होती.

त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

उदयनिधी स्टालिन यांच्या वक्तव्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं समर्थन असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उदयनिधी स्टालिन यांनी तामिळनाडूमध्ये बोलत असताना हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृती विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं समर्थन असावं, असं दिसत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू धर्म आणि संस्कृती संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आणि शरद पवार बसत आहे. पवार आणि ठाकरे यांना उदयनिधी स्टालिन यांचं वक्तव्य जर मान्य नसेल तर त्यांनी इंडिया आघाडी सोडावी.”

We want to win more than 45 seats in the Lok Sabha elections – Chandrashekhar Bawankule

यावेळी बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकांवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख कामांची शिदोरी आम्ही जनतेसमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत.

येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला 45 पेक्षा अधिक जागा मिळवायच्या आहे. यासाठी महायुतीच्या आघाडीतील पक्षांची बोलणं सुरू आहे. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्हाला 45 पेक्षा अधिक जागा मिळतील.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.