Eknath Shinde | सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांमुळे अजितदादा शरद पवारांपासून दूर गेले; शिंदेंच्या नेत्याचा दावा

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

Eknath Shinde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहे.

त्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि रोहित पवारांमुळे (Rohit Pawar) अजितदादा शरद पवारांपासून (Sharad Pawar) दूर गेले असल्याचं नरेश मस्के (Naresh Maske) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

What will happen to Supriya Sule in Baramati? – Naresh Maske

नरेश म्हस्के म्हणाले, “अजित पवारांसारखा माणूस रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामुळे शरद पवारांपासून लांब गेला आहे. आगामी निवडणुकांमध्ये रोहित पवारांची नक्की काय स्थिती आहे? हे कळेल.

त्यांनी बारामतीत अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या नेतृत्वासमोर लढून दाखवावं. त्यानंतर त्यांनी आम्हाला सल्ला द्यावा. त्याचबरोबर त्यांनी श्रीकांत शिंदे यांची काळजी करण्याऐवजी बारामती सुप्रिया सुळे यांचं काय होईल? याकडे लक्ष द्यायला हवं.”

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. 6 ऑक्टोबर 2023 पासून निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादीची सुनावणी सुरू होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे. अजित पवारांच्या मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अजित पवारांच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा होईल? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe