Jitendra Awhad | पत्रकार विरोधात का लिहितात याचं आत्मपरीक्षण करा म्हणजे विषय संपेल; बावनकुळेंच्या वक्तव्यावर आव्हाडांची प्रतिक्रिया

Jitendra Awhad | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होताना दिसत आहे.

आपल्या विरोधात पत्रकारांनी बातमी छापू नये, यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे नक्की काय? तुम्हाला कळालच असेल.

त्याचबरोबर त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

अशात आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार विरोधात लिहीत आहेत, ते का लिहीत आहेत, याचे आत्मपरिक्षण करा म्हणजे विषय संपेल, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Journalists present their role in the right way – Jitendra Awhad

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “पत्रकारांनी विरोधात बातमी दिली तर त्यांना धाब्यावर न्या असं म्हणून पत्रकारांच्या स्वाभिमानावर हल्ला करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना हे माहित नसेल की, पत्रकार आप-आपली भूमिका ही योग्यप्रकारे मांडत असतात.

तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात बातम्या देणं हा त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. जेवणासाठी ते लाचार आहेत असं म्हणून आपण त्यांचा अपमान केलेला आहे.

तुम्ही धाब्यावर न्या, हॉटेलवर न्या, नाहीतर घरी जेवायला न्या. पत्रकार हा पत्रकार म्हणूनच काम करतो आणि तो नि:पक्षणे पत्रकारिता करीत असतो.

तो त्याचा अधिकार आहे. आपण धाब्यावर नेले काय किंवा घरी जेवायला बोलावले काय. सध्याचं वातावरण बघता पत्रकार विरोधात लिहीत आहेत; ते का लिहीत आहेत, याचे आत्मपरिक्षण करा म्हणजे विषय संपेल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.