Rohit Pawar | त्यांना अजून महाराष्ट्र कळलेला नाही; बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपनंतर विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे.

2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी तुम्ही पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे काय करायचं तुम्हाला समजलं असेल.

त्याचबरोबर त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

The pride of Maharashtra does not bow before Delhi – Rohit Pawar

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “बावनकुळे साहेब, ज्याप्रमाणे दिल्लीतले पत्रकार तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतात त्याप्रमाणे महाराष्ट्रातले पत्रकारही तुमच्या दबावाला, प्रलोभनांना बळी पडून तुम्हाला सोयीस्कर भूमिका घेतील हा तुमचा समज असेल तर मग तुम्हाला अजून महाराष्ट्र कळलेला दिसत नाही.

महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच दिल्लीसमोर झुकत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही मांडलेली भूमिका मला पूर्णतः चुकीची वाटते, याबाबत मराठी पत्रकारही त्यांची भूमिका मांडलतीलच!”

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, “येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी आता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेला खरेदी करू पाहत आहेत!

सत्ताधार्यांवर अंकुश ठेवण्याचं काम पत्रकार करत असतात परंतु हा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना चिरीमिरीचे आमिष देण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.