Share

Vijay Wadettiwar | बावनकुळे राज्यातील पत्रकारांना चिरीमिरी घेणारे समजताय का? – विजय वडेट्टीवार

🕒 1 min read Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर त्यांना ढाब्यावर … Read more

Published On: 

🕒 1 min read

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये. यासाठी तुम्ही त्यांना चहा प्यायला घेऊन जा. चहा प्यायला घेऊन जायचं म्हणजे काय तुम्हाला समजलं असेल. त्याचबरोबर त्यांना ढाब्यावर घेऊन जा, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का?, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे जी, तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वतःचा इमान विकतील असं नाही.

दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरुद्ध आवाज दबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांची आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो.

पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? तुमची आजची अवस्था पाहून आगामी निवडणुकीत तुम्ही मतांसाठी जनतेला सुद्धा चिरीमीरी द्यायचा प्रयत्न करणार हे नक्की…. पण जनता २०२४ मध्ये भाजपची चिंधी उधळल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे.

In a democracy, newspapers are the work of the opposition – Supriya Sule

दरम्यान, प्रकरणावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ”

“विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही‌. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात.

राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात हि अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे.

ज्याअर्थी चंद्रशेखर बावनकुळे जी कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे.

भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी‌.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही