Vijay Wadettiwar | केंद्रीय मंत्री आल्यावर सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं नाही; वडेट्टीवारांची शिंदे-फडणवीसांवर टीका

Vijay Wadettiwar | नागपूर: आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.

त्यांच्या या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आशिष शेलार (Ashish Shelar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्यासोबत उपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री आल्यावर सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं नाही, मात्र आता हुजरेगिरीची पद्धत सुरू झाली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

It is not necessary for all the ministers to be present when the Union Minister comes – Vijay Wadettiwar

प्रसार माध्यमांशी बोलत असताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणपतीचं दर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहे.

मात्र, केंद्रीय मंत्री आल्यावर सर्व मंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचे नाही. पण, आता हुजरेगिरीची पद्धत सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत होणारी बैठक ही भारतीय जनता पक्षाची बैठक वाटत आहे.

कारण या बैठकीला आम्हाला बोलावलेलं नाही. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर यांना तोडगा काढायचा नाही, म्हणून यांनी या बैठकीला विरोधकांना बोलावलं नाही.”

दरम्यान, शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी ऑनलाइन व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे.

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.