Share

Ambadas Danve | प्रसार माध्यमांवर बंदी घालणं म्हणजे हुकूमशाही – अंबादास दानवे

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. लोकशाही वृत्तवाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

किरीट सोमय्या यांचा हा व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल लोकशाही चॅनलवर कारवाई करण्यात आली आहे. काल (22 सप्टेंबर) संध्याकाळी 07 वाजेपासून पुढील 72 तास लोकशाही चॅनल बंद ठेवण्याचे आदेश प्रसार मंत्रालयाने दिले आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांवर बंदी घालणं म्हणजे हुकूमशाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Banning any channel is very wrong – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “कोणत्याही चॅनलवर अशा प्रकारची बंदी घालणं अत्यंत चुकीचं आहे. प्रसार मंत्रालयाने लोकशाहीला 72 तास चॅनल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.

आज लोकशाही चॅनल आहे, उद्या दुसरं कोणतं चॅनेल असेल. या चॅनलने फक्त सरकारची तडी उचलायला हवी. या चॅनलने सरकारचे गोडवे गायला पाहिजे, अशी मानसिकता जर निर्माण होत असेल तर जनता ही सर्वश्रेष्ठ आहे.

चॅनलची बातमी ऐकून जनता आपलं मत ठरवत नाही. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यमांवर अशा प्रकारची बंदी घालणं म्हणजे हुकूमशाही आहे.”

दरम्यान, प्रकरणावरून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ट्विट करत अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’. सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्या सरकारकडून सूडबुद्धीने माध्यमांचा गळा घोटला जातोय, या हीन वृत्तीचा जाहीर धिक्कार.

लोकशाहीचा चौथा खांब असणाऱ्या पत्रकारितेची ज्याप्रकारे सत्ताधारी पक्षाकडून मुस्कटदाबी सुरू आहे, त्याचा समाजाच्या सर्वच स्तरांतून तीव्र निषेध व्हायलाच हवा!

सत्य हे पचायला कठीण जरी असलं तरी जनतेसमोर सत्य आणण हे माध्यमांचं कर्तव्य आहे. पण इथं चुकीचं वागणारा बाहेर फिरतो व खरं वागणाऱ्याला शासन होते.

अजब सरकारचा हा गजब कारभार पाहून हे सरकार लोकशाही विरोधी आहे, हे सिद्ध होतंय! कमलेशजी या लढ्यात आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे उभे आहोत! आपण एकजुटीने या हुकूमशाही विरोधात आवाज बुलंद करत राहू!”

महत्वाच्या बातम्या

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now