Share

Hasan Mushrif | मोठी बातमी! हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

Hasan Mushrif । पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे.

यावर हसन मुश्रीफ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणावर मी बोलणार आहे, असं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आपल्याच नव्हे तर इतर नातेवाईक आणि मुलीच्या घरावरही छापेमारी करण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच विशिष्ट समुदायाच्या लोकांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही मुश्रीफ यांनी केला आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणीच ईडीने ही धाड मारल्याची माहिती मिळत आहे. ईडीचे पथक सकाळी कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळपासून पथकाने मुश्रीफ यांच्या घराची तपासणी सुरु केली आहे. तसेच, घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अशात मुश्रीफ यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुश्रीफ समर्थक रस्त्यावर उतरलेत. मुश्रीफसाहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा घोषणा दिल्या जात आहेत. ईडीकडून केली जाणारी कारवाई बेकायदेशीर आहे, असं म्हणत हजारो कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या घराकडे रवाना झालेत. कागल बंदची हाक या कार्यकर्त्यांनी दिली आहे. जिल्हा बंदची हाक देण्याची तयारीही या कार्यकर्त्यांनी दाखवलीय.

महत्वाच्या बातम्या :

Hasan Mushrif । पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune

Join WhatsApp

Join Now