Share

Amit Shah | अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर; शिंदे-फडणवीसांसह घेणार भाजप नेत्यांच्या भेटी

Amit Shah | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शाह सहकुटुंब मुंबईमध्ये येत असल्याचं बोललं जात आहे. लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. … Read more

Published On: 

Amit Shah | मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अमित शाह सहकुटुंब मुंबईमध्ये येत असल्याचं बोललं जात आहे.

लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अमित शाह यांचा हा मुंबई दौरा गणपती दर्शनासह राजकीय पार्श्वभूमीवर असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.

Amit Shah will arrive at Mumbai airport at 02 pm today

आज दुपारी 02 वाजता अमित शाह मुंबई विमानतळावर दाखल होणार आहे. त्यानंतर दुपारी 03 वाजता ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहे.

दुपारी 3.50 ते 04 दरम्यान ते मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथील बाप्पाचे दर्शन घेणार आहे. 4 ते 4.15 या कालावधीमध्ये अमित शाह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेणार आहे.

त्यानंतर शाह 4.30 वाजता आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे येथील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेणार आहे. 5.30 ते 7 दरम्यान ते मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मणराव स्मृती इराणी व्याख्यान कार्यक्रमात सहभागी होणार आहे. संध्याकाळी 07  वाजता अमित शाह दिल्लीला रवाना होणार आहेत.

दरम्यान, लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी यंदा राज्यभरातून लाखो भाविक लालबागमध्ये दाखल झाले आहे. गणपतीच्या पहिल्याच दिवशी जवळपास वीस लाखाहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं असल्याचं बोललं जात आहे.

गणपतीच्या पहिल्या दिवशी लालबाग राजाच्या चरणी 12 लाख रुपये रोख रक्कम दान आले असल्याची माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे. आतापर्यंत लालबागच्या  राजाचं मुकेश अंबानी, शाहरुख खान, अमित ठाकरे यांच्यासह अनेक बड्या लोकांनी दर्शन घेतलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही