Share

Vijay Wadettiwar | शिवसेना आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे व्हावी – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना झापलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर … Read more

Published On: 

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला उशीर होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना झापलं होतं. त्यानंतर या सुनावणीच्या घडामोडींनी वेग धरला आहे.

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत येत्या दोन आठवड्यात सुनावणी घेऊन माहिती देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार 25 सप्टेंबर रोजी ही सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक मागणी केली आहे. शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी, अशी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे करण्यात यावी.

राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे.

संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.”

The disqualification of Shiv Sena MLAs will be heard on September 25

दरम्यान, 25 सप्टेंबर 2023 रोजी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या सुनावणीला ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटप्रमुख एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आमने-सामने येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत संकेत दिले आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही