Sanjay Raut | मुंबई: शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) खोचक शब्दांत टीका केली होती.
मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. रामदास कदम यांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास कदम यांच्यासह शिवसेना सोडून गेलेले आमदार जेव्हा निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची उंची किती आहे? ते त्यांना कळेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
Ramdas Kadam was our colleague – Sanjay Raut
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “एकेकाळी रामदास कदम हे आमचे सहकारी होते. त्यांनी ज्या शब्दांमध्ये आमच्यावर टीका केली, त्या शब्दात मी बोलणार नाही. कारण आमचे अनेक वर्षांचे संबंध आहेत. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलं आहे.
मात्र, सध्या त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे. त्यांची कारण त्यांच्यापाशी. मात्र, शिवसैनिक आणि जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. रामदास कदम यांच्यासह शिवसेना सोडून गेलेले आमदार निवडणुकीला उभे राहतील तेव्हा कोणाची किती उंची आहे हे त्यांना कळेल.
जे विधानसभा सदस्य पळून गेले आहे, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे. तेव्हा कोण किती उंच आहे हे कळेल.”
दरम्यान, रामदास कदम यांनी खोचक शब्दात आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांच्या विषयी मी बोलणं योग्य राहणार नाही. कारण आदित्य ठाकरेंवर बोलावं एवढी त्यांची उंची नाही.
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची कधी भेट घेत नव्हते. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी सत्तेत आल्यानंतर त्यांना कामाला लावलं आहे. आता बाप आणि बेटा दोघेही पळत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गद्दार, गँगस्टर, बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार – आदित्य ठाकरे
- Anil Parab | सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागेल – अनिल परब
- Rahul Narwekar | आमदार अपात्रतेबाबत घडामोडींना वेग; विधानसभा अध्यक्षांनी दिले मोठे संकेत
- Jayant Patil | देश अमृतकाळ साजरा करतोय अन् शेतकरी विष पिऊन मरतोय – जयंत पाटील
- Sanjay Raut | निर्णय घेण्यासाठी नार्वेकरांना भाजप कार्यालयात जावं लागतं – संजय राऊत