Share

Aditya Thackeray | महाराष्ट्रात सध्या गद्दार, गँगस्टर, बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार – आदित्य ठाकरे

🕒 1 min readAditya Thackeray | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना सिंधुदुर्गवासीयांनी आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी ओरोस येथे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.Related News for You‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage वरून संजय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना सिंधुदुर्गवासीयांनी आदित्य ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत केलं.

यावेळी ओरोस येथे पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

महाराष्ट्रात सध्या गद्दार, गँगस्टर, बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेनंतर शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येणार असल्याचं दिसत आहे.

This government is just wasting the money of poor people – Aditya Thackeray 

पत्रकार परिषदेत बोलत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “मिंधे सरकार योजनांसाठी फक्त निधीची घोषणा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात निधी देत नाही. हे सरकार फक्त गोरगरीब जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे.

महाराष्ट्रात सध्या गद्दार, गँगस्टर, बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरांचं सरकार आहे. मूळ भाजप कार्यकर्त्यांना बाजूला करून गद्दारी करणाऱ्यांना मंत्रिपद मिळत आहे.

देशात आणि राज्यात लोकशाही उरलेली नाही. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने देशातील लोकांची काम रेंगाळत आहे.”

दरम्यान, आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यावर टीका केली आहे.

ते म्हणाले, “आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना दिल्लीत भाजप कार्यालयात जावं लागतं. आमच्या मनात ज्या शंका आहे, त्यांना यानंतर बळ मिळत आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून त्यांनी हा घटनात्मक पेच वाढवून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि निकाल अत्यंत स्पष्ट आहे. मात्र, त्यांनी हा वेळ काढूपणा केला आहे.

आठ दिवसात कारवाई सुरू करा, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे. तरी देखील त्यांनी याबाबत कारवाई सुरू केली नसेल तर महाराष्ट्रात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला सन्मान मिळत नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!