Eknath Shinde | महिलांसाठी हा गौरवाचा सण; महिला आरक्षण विधेयकावर CM शिंदे यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक सादर केलं आहे. हे विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत देखील मंजूर झालं आहे.

या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या ठिकाणी आगळ्यावेगळ्या पद्धतीने याचं स्वागत करण्यात आलं.

देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा हा क्षण महिलांसाठी गौरवाचा सण असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या ठिकाणी विधेयकाचं स्वागत करण्यात आलं आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीने याबद्दल गणपती बाप्पाची विशेष आरती करून देवाचे आभार मानले आहे. या आरतीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या शंभर महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहे.

This is a commendable step to honor the power of women in democracy – Dilip Walse Patil

दरम्यान, हे विधायक मंजूर झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत दिलीप वळसे पाटील म्हणाले, “संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ बहुमताने मंजूर झाले हा महिला सशक्तीकरणाच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक व निर्णायक घटना आहे.

या विधेयकामुळे लोकसभा तसेच विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षित भागीदारी मिळेल. लोकशाहीतील नारीशक्तीचा सन्मान करण्याचे हे स्तुत्य पाऊल आहे.

भारतीय समाजव्यवस्थेतील सर्वांगीण विकासाच्या उद्दिष्टांसाठी हा निर्णय अंमलात आणल्याबद्दल सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, त्यांचे केंद्र सरकारमधील सहकारी व संसदेतील सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन!”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.