Share

Ajit Pawar | अजित पवारांचा नवा डाव; याचिका दाखल करत विधिमंडळात केली एक मागणी

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली. अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांनीही आपले … Read more

Published On: 

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. 02 जुलै 2023 रोजी अजित पवार बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांवर अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली. अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांनीही आपले प्रदेशाध्यक्ष, व्हीप आणि अध्यक्ष यांची नावं घोषित केली.

या सर्व घटनांनंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाला मोठा झटका दिला आहे. विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे अजित पवार गटाने याचिका दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

विरोधी कृत्य करणाऱ्या शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी अजित पवार (Ajit Pawar) गटाने विधिमंडळ अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती मिळाली आहे.

मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हीच आहोत, असं सांगत अजित पवार गटानं ही मागणी केली आहे. अजित पवार गटाच्या या मागणीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर शरद पवार गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

The Election Commission will give a hearing on 06 October 2023 regarding NCP’s party and symbol

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या नावावर आणि चिन्हावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या चिन्हाचा आणि नावाचा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचला.

निवडणूक आयोग 06 ऑक्टोबर 2023 ला राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी देणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाने दाखल केलेल्या याचिकेबाबतीत ही सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान राष्ट्रवादीचे दोन्ही गट आपापली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडताना दिसतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही