Gopichand Padalkar | धनगर आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा – गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे.

धनगरांना आरक्षण मिळावं, यासाठी धनगर समाज आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे  बैठक बोलावली आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार होते.

अशात आता या प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनगर आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

Govt should take positive decision on Dhangar reservation – Gopichand Padalkar

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले, “धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही एक पत्र दिलं होतं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी ठीकठिकाणी त्यांचं उपोषण आणि आंदोलन सुरू आहे.

त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणी बाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, हीच आमची सरकारला मागणी आहे. आजच्या घडीला बाकी कोणताच विषय महत्त्वाचा नाही. आमच्या आरक्षणाचं प्रकरण अत्यंत सोपं असून ते फक्त नीट समजून घेण्याची गरज आहे.”

पुढे बोलताना ते (Gopichand Padalkar) म्हणाले, “राज्यात धनगड जमात अस्तित्वात नाही. राज्यभरात तहसीलने किती लोकांना धनगड जातीचं प्रमाणपत्र दिलं, याबाबत आम्ही माहिती घेतली होती.

राज्यात धनगड जातीचं प्रमाणपत्र कोणालाही दिलं नसल्याची माहिती आम्हाला त्यावेळी मिळाली होती. 2007 मध्ये आम्ही यासाठी आंदोलन सुरू केलं. त्यावेळी तब्बल 52 सभा झाल्या होत्या. तेव्हा असलेल्या सरकारने आमच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा देखील केली होती.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.