Bacchu Kadu | अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात; महिला आरक्षणावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu | सोलापूर: सध्या संसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक सादर केलं आहे. यानंतर सगळीकडे मोदी सरकारचं कौतुक होताना दिसत आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. महिला खरोखर स्वातंत्रपणे कारभार बघतात का? अनेक महिलांचे पती परमेश्वरच काम बघतात, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

After getting reservation, women will get more opportunities now – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “महिला आरक्षण विधेयकानंतर राजकारणात महिलांचा सहभाग वाढेल अशी, अनेक नेतेमंडळी प्रतिक्रिया देत आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आधीपासूनच उपलब्ध आहे. यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये 50% महिलांचं राज्य आहे.

मात्र, खरोखर महिला कारभार बघतात का? महिलांचे पती परमेश्वरच कारभार चालवताना दिसतात. तर काही ठिकाणी महिलांच्या कामांमध्ये त्यांचे नातेवाईक सासरे लुडबुड करताना दिसतात.”

पुढे बोलताना ते (Bacchu Kadu) म्हणाले, “आरक्षण मिळाल्यानंतर महिलांना आता आणखीन संधी मिळणार. या संधीचा महिला मंडळी नक्कीच सोनं करतील.

अनेक दशक भारतीय राजकारणात महिला नेतृत्वांना जागा मिळाली नव्हती, असं म्हणत केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक लोकसभेत मांडून ते पास करून घेतलं आहे.

राज्यसभेत ते आता चर्चेला येईल. मात्र, इतर क्षेत्रांप्रमाणे राजकारणात देखील पुरुषप्रधान व्यवस्थेचा प्रभाव दिसून येत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.