Share

Maratha Reservation | आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद करणार नाही – मनोज जरांगे

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी 17 दिवस उपोषण केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून त्यांनी उपोषण मागे घेतलं.

उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

We are protesting peacefully – Maratha Reservation

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना मनोज जरांगे म्हणाले, “आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. त्यामुळे सरकारवर दबाव येण्याचं काहीच कारण नाही.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी हवा होता. त्यानुसार आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे. अमरण उपोषण स्थगित करा, असं देखील सरकारने म्हटलं होतं. ते देखील आम्ही मागे घेतलं आहे”

पुढे बोलताना ते म्हणाले, “अमरण उपोषण मागे घेतलं असलं तरी साखळी उपोषण सुरू ठेवणार, असं मी सरकारला स्पष्ट सांगितलं होतं. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्याशिवाय आम्ही आंदोलन बंद करणार नाही.

उपोषण मागे घेण्याचा जसा मी सरकारला शब्द दिला होता, तसाच शब्द मी मराठ्यांना दिला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा शब्द मी मराठा समाजाला दिला आहे.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला माझ्यावर अत्यंत विश्वास आहे. त्याचबरोबर माझा देखील मराठा समाजावर विश्वास आहे. सरकारला दिलेल्या वेळेवर मी ठाम आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला दिलेल्या शब्दावर मी ठाम आहे.

चार-पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा आंदोलन स्थळी दाखल होणार आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी एक इंच देखील मागे हटणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now