Share

Eknath Shinde | शिंदेंचे आमदार अपात्र ठरणार? उद्धव ठाकरे आणि शिंदेंना विधानसभा अध्यक्ष पाठवणार नोटीस

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांच्याकडे सोपवलं. यानंतर आता आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांना … Read more

Published On: 

Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकाल दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांच्याकडे सोपवलं.

यानंतर आता आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Rahul Narwekar will send notice soon

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोघांनाही आमदार अपातत्रेबाबत आपापली बाजू मांडवी लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यासाठी दोन्ही गटातील प्रमुखांना राहुल नार्वेकर लवकरच नोटीस पाठवणार आहे. ही नोटीस लवकरच पाठवली जाऊ शकते. या माहितीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गट आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपापली बाजू मांडली. दोन्ही गटाची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटानं केली होती.

मात्र, शिंदे गटानं ठाकरे गटाच्या या मागणीला विरोध केला होता. त्यानंतर शिंदे गटाची मागणी स्वीकारत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या गटाच्या आमदारांच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना वेळ दिल्यामुळे आमदार अपात्रेची सुनावणी आता लांबणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही