Eknath Shinde | धनगरांना आरक्षण मिळणार? CM शिंदेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Eknath Shinde | मुंबई: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.

अशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज देखील पेटून उठला आहे. धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे.

Eknath Shinde has called an important meeting

चौंडी येथे गेल्या पंधरा दिवसांपासून आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

या बैठकीसाठी धनगर समाजाचं शिष्टमंडळ मुंबईला रवाना झालं आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे दुपारी 02 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Eknath Shinde) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) सोलापूर दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावर असताना ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते.

या दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. धनगर कार्यकर्ते शिखर बंगाळे काही कार्यकर्त्यांसह विखे पाटलांना भेटायला गेले होते.

तेव्हा त्यांनी विखे पाटलांवर भंडारा उधळला. त्यानंतर त्यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटून उठला आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.