Vijay Wadettiwar | चंद्रपूर: राज्य सरकारने कंत्राटी नोकरी भरतीचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही कंत्राटी नोकरी भरती काही काळापुरती मर्यादित असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं होतं.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. अजित पवार पक्ष फोडून गेले आहे. आता त्यांनी तरुणांना उध्वस्त करण्याचे पाप करू नये, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, “06 सप्टेंबर 2023 पासून राज्य सरकार हा अध्यादेश लागू करणार आहे. हा आमचा निर्णय होता, असं आत्ताच सरकार सांगत आहे. मात्र, हा निर्णय आमच्यावेळी फक्त पंधरा प्रवर्गासाठी होता.
यामध्ये संगणक चालक, डाटा ऑपरेटर यांचा समावेश होता. मात्र, सरकारने यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर सर्व पदांचा समावेश केला आहे.
त्यामुळे पन्नास हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा हजार रुपये कंपनीला मिळतील. यामुळे राज्यातील तरुणांचं भविष्य उध्वस्त होऊ शकतं.”
Ajit Pawar calls himself a great leader – Vijay Wadettiwar
पुढे बोलताना ते म्हणाले, “अजित पवार स्वतःला मोठे नेते म्हणवतात. मात्र, हे मोठे नेते खोटं बोलून तरुणांची फसवणूक करत आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका, असं मी थेट अजित पवारांना सांगत आहे. तुम्ही पक्ष फोडून गेला आहात, हा तुमचा विषय आहे. परंतु आता तरुणांना उध्वस्त करण्याचं पाप तरी करू नका.
सध्याचं सरकार राज्यातील तरुणाई उध्वस्त करायला निघालं आहे. तरुणांनो याच्या विरोधात आवाज उठवा, आंदोलन करा. सरकार जोपर्यंत अध्यादेश परत घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | “मित्रा”साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा समाजाला आरक्षण द्या, खाजगीकरण रद्द करा – सकल मराठा समाज
- Supriya Sule | केंद्र सरकारला मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळण्यात अपयश – सुप्रिया सुळे
- Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
- Prithviraj Chavan | मोदी पुन्हा निवडून आले तर देशात रशियासारखी हुकूमशाही येईल – पृथ्वीराज चव्हाण