Prithviraj Chavan | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे. आजपर्यंत देशातील सरकार संविधान आणि लोकशाही पद्धतीने काम करत होते.
मात्र, जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आहे, तेव्हापासून देशात हुकूमशाही पद्धतीने काम सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
We have to win this second battle of freedom to preserve democracy – Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचं पुन्हा सरकार आलं तर भारतामध्ये चीन आणि रशियासारखी हुकूमशाही येईल.
आजपर्यंत देशातील सरकार संविधान आणि लोकशाही पद्धतीने काम करत होते. मात्र, जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं आहे, तेव्हापासून देशात हुकूमशाही पद्धतीने काम सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष जर पुन्हा सत्तेत आला तर लोकांना कोणत्याही प्रकारचे अधिकार राहणार नाही. लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आपल्याला जिंकायची आहे.”
यावेळी बोलत असताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून देखील मोदी सरकारवर टीका केली आहे.
ते म्हणाले, “सुमारे सात हजार शाळा खाजगीकरणाकडे वाटचाल करताना दिसत आहे. त्याचबरोबर तेल आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.
राज्यामध्ये नोकरीच्या भरती होताना दिसत नाही. तर दुसरीकडे कंत्राटी पद्धतीने नोकरी दिल्या जात आहे. नरेंद्र मोदींनी फक्त तेलावर कर लादून तीस कोटी रुपये उभे केले आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले
- Eknath Shinde | मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही – एकनाथ शिंदे
- Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप
- Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका
- Amit Shah | पैशाची नासाडी! अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द