Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले

Sanjay Raut | मुंबई: आज राज्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी केली होती.

शिवसेनेचे 40 आणि अपक्ष 10 आमदार घेऊन एकनाथ शिंदे भाजप सरकारमध्ये सामील झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी 16 आमदारांच्या आपात्रेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केली होती.

आज या याचिकेची सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज सत्य आणि न्यायचा विजय होणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Truth and justice will win in court today – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “न्यायालयात आज काय घडेल? याबद्दल मी काही सांगू शकत नाही. मात्र कोर्टात आज सत्य आणि न्यायाचा विजय होणार आहे.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहे. विधिमंडळात पडलेली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

त्यामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव याबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होण्याचं कारण नाही. विधिमंडळातील फूट हा वेगळा विषय आहे आणि पक्षातील फुट हा वेगळा विषय आहे.

विधिमंडळ किंवा संसदेतील काही आमदार आणि खासदार सोडून गेले, म्हणजे पक्ष फुटला असं नाही. हे चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना एक संघ आहे आणि एक संघ राहणार.

यावेळी बोलत असताना पत्रकारांनी ‘ठाकरे गट’ असं नमूद करत संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारला. यानंतर संजय राऊत पत्रकारांवर संतापत म्हणाले ठाकरे गट नाही शिवसेना म्हणा.

ते म्हणाले, “ठाकरे गट नाही शिवसेना म्हणा. सध्या संविधान, कायदा आणि विधिमंडळाच्या नियमांशी बेईमानी सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यापूर्वी आदेश दिले होते. मात्र, अजूनही त्यावर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले विधानसभा अध्यक्ष चालवताय का?”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.