Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे. या आंदोलनादरम्यान मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली गेली होती.
या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमक झाला होता. त्यानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये कोणताही वाटेकरी होणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची सरकारची भूमिका नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
The government is trying to get reservation for the Maratha community – Eknath Shinde
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ज्यांच्या नोंदी पूर्वी निजामकालीन असतील. ज्यांच्यावर कुणबी नोंद असेल आणि नंतर ती बदलली गेली असेल त्यांची माहिती मिळवायला हवी.
ही माहिती मिळाल्यानंतर खरंच कुणबी असेल तर त्यांना प्रमाणपत्र देण्यास ओबीसींचा विरोध नाही. सरसकट मराठ्यांना दाखला देण्यावर ओबीसींचा आक्षेप आहे.
मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण आहे तेवढेच ठेवून मराठा समाजाचं रद्द झालेलं आरक्षण परत मिळावं. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारचे प्रयत्न देखील सुरू आहे.
यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले, “सध्या नाना फोटो यांना कोणी गांभीर्याने घेत नाही.
त्यामुळे ते काहीही विधान करत असतात. गंभीर आरोप केल्याने कुणीतरी त्यांची दखल घेईल, असं त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांची ही तडफड सुरू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Shinde Group | ठाकरे गट आणि जितेंद्र आव्हाडांकडून महाराष्ट्रात दंगे घडवण्याचं प्लॅनिंग; शिंदे गटातील नेत्याचा आरोप
- Uddhav Thackeray | भाजपची सनातन धर्म विषयाची चिंता पोकळ; ठाकरे गटाची भाजपवर टीका
- Amit Shah | पैशाची नासाडी! अमित शाहांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द
- Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं
- Eknath Shinde | आम्ही फक्त घोषणा नाही तर अंमलबजावणी देखील करतो – एकनाथ शिंदे