Share

Eknath Shinde | आम्ही कुठं थांबलोय याची आधी शहानिशा करा; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना सुनावलं

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. राजा खातोय तुपाशी … Read more

Published On: 

Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. राजा खातोय तुपाशी शेतकरी मात्र उपाशी, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं.

We did not stay in a five star hotel – Eknath Shinde

विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला उत्तर देत एकनाथ (Eknath Shinde) शिंदे म्हणाले, “आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही तर शासकीय विश्रामगृहात थांबलो आहे.

पंचतारांकित हॉटेलमध्ये कोण थांबलं आहे? हे माहित आहे ना. जे लोक आले होते ते धर्म शाळेत राहिले होते का? त्यांच्यासाठी तब्बल 100 खोल्या बुक करण्यात आल्या होत्या. आम्ही कुठे थांबलो याची आधी शहानिशा करा.”

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. ट्विट करत ते म्हणाले, “राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी.

विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी. दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन ?

फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री), ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव), अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी), महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक), वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी) एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही