Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसले आहे.

अशात आता या बैठकीपूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. आत्ताच सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Don’t expect anything from the current government – Nana Patole

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “सध्याच्या सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करू नये, असं चित्र निर्माण झालं आहे. हे सरकार फक्त घोषणा करणार आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी 42 हजार कोटींची घोषणा केली होती. त्या गोष्टीचं पुढे काय झालं?

त्याचबरोबर महायुतीच्या काळात अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले आहे. सध्याच्या सरकारमुळे महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कमी झाला आहे. त्यामुळं हे सरकार राज्याला अधोगतीकडे नेणारं सरकार आहे.”

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या या बैठकीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहेत. ट्विट करत जयंत पाटील म्हणाले, “मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पीक हातातून गेलंय त्या पार्श्वभूमीवर आजची राज्यमंत्रीमंडळाची बैठक अतिशय महत्वाची आहे.

पंचनामे अजून झालेले नाहीत, दुष्काळ जाहीर केलेला नाही, शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न आहे.

शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे मराठवाड्यात सर्वात अधिक आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात १८६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पहायला हवं.

इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही.

दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं रूप दिले आहे. अति उत्साहात सरकार सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्याचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.