Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालं आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Sanjay Raut was given a pass by the police to attend this press conference
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे.
संजय राऊत यांना या पत्रकार परिषदेत उपस्थित राहण्यासाठी पोलिसांनी पास देखील दिला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. यानंतर संजय राऊत खरंच या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार का? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मराठवाड्यात होणाऱ्या या बैठकीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील जनतेला न्याय देणारी व्हावी. आजची परिस्थिती बघता राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज आहे.
कारण पाऊस नसल्याने खरीप तर हाताचा गेलाच पण आता पिण्याचं पाणी आणि जनावरांना चारा या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे, शिवाय सामान्य कुटुंबातील मुलांना शाळेची फी भरणही कठीण आहे.
त्यामुळे राज्य सरकारने राज्याच्या हितासाठी स्वतःच्या #ट्रिपल_इंजिनला दिल्लीच्या #जंबो_इंजिनाची जोड देऊन दुष्काळामुळं निर्माण झालेले प्रश्न सोडवावेत, ही विनंती!”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार
- Uddhav Thackeray | देव-देवतांची फसवणूक करायला हे सरकार मागे पुढे पाहत नाही; ठाकरे गटाची टीका
- Eknath Shinde | विरोधानंतर CM शिंदेंचा मुक्काम आता पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय गृहात
- Chitra Wagh | संजय राऊतांच्या डोक्यावर जेलमध्ये गेल्यामुळे परिणाम झालाय – चित्रा वाघ
- Nana Patole | सध्याचं सरकार संवेदनशील नाही तर गेंड्याच्या कातडीचं – नाना पटोले