Eknath Shinde | छत्रपती संभाजीनगर: आज (16 सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम आतापर्यंत शासकीय विश्रामगृहात असायचा. मात्र, यंदा मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं होतं.
मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांचा मुक्काम पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आला होता. या मुद्द्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
विरोधकांच्या या टिकांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहामध्ये हलवला असल्याची माहिती मिळाली आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मुक्काम हलवला असल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे.
Will the problems of the people of Marathwada be solved after the cabinet meeting? – Nana Patole
दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती. नाना पटोले म्हणाले, “राज्यातील येड्यांच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे.
राज्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची एवढी गंभीर परिस्थिती असताना मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करत आहे. जनसामान्य लोक संकटात असताना मुख्यमंत्री आपल्या बैठकीवर कोट्यावधी रुपये खर्च करताना दिसत आहे.
त्यामुळे सध्याचं सरकार संवेदनशील नाही तर गेंड्याच्या कातडीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठवाड्यातील लोकांच्या समस्या सुटणार असतील तर आम्ही त्या बैठकीचं स्वागत करतो. मात्र, त्यासाठी एवढा थाट कशाला हवा?”
महत्वाच्या बातम्या
- Chitra Wagh | संजय राऊतांच्या डोक्यावर जेलमध्ये गेल्यामुळे परिणाम झालाय – चित्रा वाघ
- Nana Patole | सध्याचं सरकार संवेदनशील नाही तर गेंड्याच्या कातडीचं – नाना पटोले
- Vijay Wadettiwar | राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी; वडेट्टीवारांनी CM शिंदेंना धारेवर धरलं
- Prakash Ambedkar | निवडणुकांपूर्वी देशातील पाच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होणार – प्रकाश आंबेडकर
- Sanjay Raut | CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण